Shri Mahalaxmi Mandir Abhishek – 28.09.17 – 09.15AM

Advertisements

सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातर्फे आज विश्वस्तांनी व भाविकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातर्फे आज विश्वस्तांनी व भाविकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
पुणे- दिनांक -२७ सप्टेंबर २०१७– सांगा देवी… माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला … हि देवीची स्तुती करणारी आराधना म्हणत अंध मुलांनी आज महालक्ष्मी देवीला साकडं घातलं . आज बुधवारी दुपारी ४. वाजता सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अंध मुलांच्या गवळण,भक्तिगीते,अभंग , देवीच्या भजनानंतर मंदिरात जमलेल्या भाविकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कोरेगांव पार्क येथील पुणे अंधशाळा , मुलांची या अंध शाळेतील ५० अंध मुलांच्या हस्ते महालक्ष्मी देवीची सामूहिक आरती केली.   त्यानंतर महालक्ष्मी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल यांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य देऊन खास सन्मान  करण्यात आला. याप्रसंगी विश्वस्त सौ. तृप्ती अगरवाल , ऍड . प्रताप परदेशी, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक शिवा  मंत्री, विश्वस्त हेमंत अर्नाळकर , प्रदीप देशमुख, अंध शाळेतील शिक्षक रामेश्वर शिळे, राजाराम जगताप , संतोष जगताप , रंगनाथ गजरे,   राजेंद्र सुतार , नितीन खरात आदी उपस्थित होते.
आज दुपारी ४. ३० वाजता अंध शाळेतील मुलांनी,  आई गोंधळ मांडला ग ..,  उघड दार देवा आत्ता … , हे ललाटाची भांडार .. दूर झोकून दे अंधार … . आदी भक्तिगीते, गवळण , अभंग सादर करून सर्व भाविकांची मने जिंकली. त्यांच्या आवाजातल्या गोडव्याने सौ. अमिता अग्रवाल यांच्यासहित भाविंकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. यांनतर सौ. अमित अगरवाल यांनी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नेत्रदान करण्याचं आवाहन केले.   नेत्रदान केल्यांनतर या अंध शाळेतील मुलांना नेत्रदृष्टी मिळवून देण्याचाही संकल्प करण्यात आला. तसेच भाविक व मंदिराचे सर्व विश्वस्त नेत्रदानाचा फॉर्मही भरून देणार आहे.

महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे- ३०० मुलींचे धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन

पैठणीचा घोळ ग … हिरव्या साडीला पिवळी किनार, आज मंगळवार देवीचा वार गं  …..या महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा मातेच्या आळवणीने पुणे  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी करत आज मंगळवारी दुपारी सारसबागेसमोरील महालक्ष्मीच्या मंदिराचा परिसर मंगलमय करून टाकला. मुलींचा उत्साह पाहून अभिनेत्रींनाही मुलींची शिकवणी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही कन्यापूजन उत्साहात साजरे केले.
महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे नवरात्रोत्सव निमित्त आज मंगळवारी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या संत
ज्ञानेश्वर  विद्या मंदिर, संत नामदेव प्राथमिक विद्यालय , सीताराम आबाजी बिब्वे स्कूल , भामरे स्कूल आदी शाळांमधील ३०० मुलींचे कन्यापूजनाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात  प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे , व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल , विश्वस्त तृप्ती अगरवाल ,ऍड . प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले , विश्वस्त रमेश पाटोडीया, माजी नगरसेवक शिव मंत्री  आदी मान्यवर उपस्थित होते.
आज दुपारी ४. वाजता सरसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन कार्यक्रमास प्रारंभ झाला. आरंभी विविध शाळांमधील मुलींनी जय मातादीचा जयघोष केला. त्यापाठोपाठ पैठणीचा घोळ गं , हिरव्या साडीला पिवळी किनार…  आज मंगळवार आज देवीचा मंगळवार.  आणि चोरी चोरी माखन खा गये , यशोदा के ललनवा….  हि गीते सादर केली.
त्यांनतर अभिनेत्री शर्वरी जेमनीस यांनी मुलांना उपदेश करणारे गीत ऐलमा पैलमा  गणेशदेवा शिकणे … गणपतीच्या हातात मोदक .. तुमच्या हाती पाटी … तुम्ही चांगले शिका … हे गीत  त्यांच्याकडून गाऊन घेतले. त्यांनंतर मुलींशी संवाद साधताना जेमनीस म्हणाल्या कि , मुलींनी भरपूर शिकावे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकताना आनन्द होतो. तीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा.
अभिनेत्री ज्योत्स्ना म्हाळसे यांनी मुलींची शिकवणीच घेतली. त्यांनी या मुलींना तुमची शाळा आवडते का.. शाळेत काय शिकवलं जात. असं विचारत देवीची माहितीही समजावून दिली. यांनतर अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी मुलींना सांगितले कि, मुलींनी खेळण्याबरोरबरच भरपूर वाचन करावे.
या अभिनेत्रींच्या भाषणानंतर कन्यापूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या तिन्ही अभिनेत्रींनींनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. गजरा त्यांना मळून त्यांची धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं पूजा केली. यांनतर महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे या मुलींना शालोपयोगी साहित्य भेट दिले.

प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे , अश्विनी कुलकर्णी यांनी आज मंगळवारी  सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या सहकारनगर व महर्षीनगर , दत्तवाडी परिसरातील विविध शाळांमधील ३०० मुलींचे धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन केले.

आम्ही सफाई कर्मचारी नसून तर आम्ही आरोग्याचे रक्षक- महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रौत्सव मध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची भावना

पुणे दिनांक २५. ०९. २०१७ – आम्ही सफाई कर्मचारी नसून तर आम्ही आरोग्याचे रक्षक व जवान आहोत अश्या शब्दात पुणे महानगर पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता सरसबागे समोरील महालक्ष्मी मंदिरात सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले . आज श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रौत्सव तर्फे पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टी. म . वि .  कॉलनी कोटी, कलाभूमी कोटी, ढोले मळा कोटी, व संदेश नगर
कोटी मधील १०० हुन अधिक महिला कर्मचायांच्या प्रसिद्ध अभिनेत्री माधवी मोरे ( मी शिवाजी राजे भोसले बोलतोय फेम ), मंदिरच्या प्रमुख विश्वस्त सौ अमिता अगरवाल, माजी खासदार प्रदीप रावत यांच्या पत्नी आशा रावत, विश्वस्त तृप्ती अगरवाल यांच्या हस्ते साडीचोळी देऊन ओटी भरून सन्मान करण्यात
आला त्यावेळी बोलताना महिला सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेत्री माधवी मोरे म्हणाल्या की, आम्हाला तुम्हा सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. तुम्ही जी सेवा करत आता, त्यामुळे पुणे शहराचे आरोग्य उत्तम राहिले आहे.
सौ आशा रावत म्हणाल्या कर, केवळ रस्ते स्वच्छ करून उपयोग नाही. त्याचबरोबर, आपली मनेही स्वच्छ झाली पाहिजेत.  मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अगरवाल म्हणाल्या कि,पुणे मनपाच्या सफाई कर्मचारी दररोज स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पुणे शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नाचे आपण सर्वानी सन्मान केलाच पाहिजे. या हेतूने मंदिरातर्फे त्यांचा सन्मान केला जात आहे.
विश्वस्त तृप्ती अगरवाल म्हणाल्या कि, सफाई कर्मचारी केवळ साफसफाई करणारे कर्मचारी नाहीत. ते शहर , रस्ते स्वच्छ ठेवतात म्हणून  आपण पुणे शहरात व्यवस्थित राहतो. रोगराईपासून लांब राहतो .
याप्रसंगी पुणे मनपाच्या सहायक आरोग्याधिकारी कल्पना बळिवंत , आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान , यांची समयोचित भाषणे झाली. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेविका सौ मनीषा चोरबेले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विश्वस्त हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोडीया राजकुमार अगरवाल आदी मान्यवर उपस्थतीत होते.
 महालक्ष्मी मंदिर,सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज पाचव्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन ओटी भरून खास सन्मान करण्यात आला.
फोटोत डावीकडून – मंदिराच्या विश्वस्त तृप्ती अगरवाल, रमेश पाटोडीया ,सौ आशा प्रदीप रावत ,प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल , अभिनेत्री माधवी मोरे,माजी नगरसेविका सौ. मनीषा चोरबेले , पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्याधिकारी कल्पना बळिवंत, उपस्थतीत होते.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या हस्ते महाआरती

नदीने पिया कभी आपण जल, वृक्ष न कभी खाये आपना फल, माता तू दया कारके चरणो मे जागा देना.. . या प्रार्थनेच्या साद्रीकरणांनंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील मुलांनी सरसबागेसमोरील महालक्ष्मी देवीची दर्शन घेतले.  या दर्शनांनंतर मुलांची मन हेलावून गेली. त्याचबरोरबर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनन्द हि ओसंडून वाहत होता.

महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे काल  रविवारी सायंकाळी महालक्ष्मी मंदिरात या मुलांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. त्याचबरोरबर त्यांना महाराष्ट्राचे मुख्य धर्मादाय आयुक्त श्री . शिवकुमार डिंगे यांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.  याप्रसंगी राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर , त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी कुवळेकर, प्रसिद्ध अभिनेत्री नेहा गद्रे,मंदिराचे मुख्य विश्वस्त  राजकुमार अगरवाल , मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल , विशवस्त ऍड प्रताप परदेशी,भरत अगरवाल , तृप्ती अगरवाल ,नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक शिवा मंत्री, विश्व्स्त हेमंत अर्नाळकर, रमेश पटोडिया  ऍड  जयवन्त मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
काल  रविवारी सायंकाळी वाघोली येथील भारतीय जैन समाज सन्घटनेच्या वस्तीगृहातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुलांनी महालक्ष्मी मंदिरास भेट दिली. यावेळी बोलताना मुलांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, महालक्ष्मी देवीचं दर्शन होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
याप्रसंगी बोलताना धर्मादाय आयुक्त श्री डिंगे म्हणाले कि, महालक्ष्मी मंदिराने केवळ धार्मिक उद्देश न ठेवता,सामाजिक जाणीव ठेवून समाजी कार्य करत आहे. त्यांचा आदर्श सर्वानी ठेवावा.  ऍड . प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक  केले. सौ. अमित अगरवाल  यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रवीण चोरबेले यांनी आभार मानले.

महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे काल  रविवारी सायंकाळी महालक्ष्मी मंदिरात आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. त्याचबरोरबर त्यांना महाराष्ट्राचे मुख्य धर्मादाय आयुक्त श्री . शिवकुमार डिंगे यांच्या हस्ते या मुलाना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.  याप्रसंगी राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर , त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी कुवळेकर, प्रसिद्ध अभिनेत्री नेहा गद्रे,मंदिराचे मुख्य विश्वस्त  राजकुमार अगरवाल , मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल , विशवस्त ऍड प्रताप परदेशी,भरत अगरवाल , तृप्ती अगरवाल ,नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक शिवा मंत्री, विश्व्स्त हेमंत अर्नाळकर, रमेश पटोडिया  ऍड  जयवन्त मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.