श्री महालक्ष्मी मंदिर दीपोत्सव २०१७

ShreeMahalaxmiMandir_Cover.jpg

दीपोत्सव, दिवेचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो, कार्तिक महिन्यामध्ये साजरा केला जातो (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) दरवर्षी हा एक महिनाभर चाललेला सण आहे दमोदोरा-लीला, बाळ कृष्णाचा गोड उपशमन लोणी चोरण्यासाठी आणि परिणामी त्याच्या प्रिय माता यशोदा यांनी मोर्टार बांधला होता.

संस्कृतमध्ये “दाम” म्हणजे दोरी आणि “उडारा” म्हणजे पोट. दामोदर म्हणतात कृष्णा एक दोर बांधला होता त्याच्या आई यशोदा यांनीकार्तिक महिन्याच्या महिमाचे वर्णन करणे शक्य नाही. या महिन्यात भक्त कठोर शपथ घ्या (दामोदर वृता) आणि अर्पण करून भगवान दामोदर यांची पूजा करा तूप दिवा प्रत्येक दिवस. असे म्हटले जाते की महिन्याच्या पहिल्या महिन्यात भगवान हरिला दिवा अर्पण करून कार्तिकला अमर्याद समृद्धी, सौंदर्य आणि संपत्ती मिळते यात सर्व पाप केले आहेत हजारो आणि लाखो जन्मा नष्ट होतात; आणि अनंतकाळचे आध्यात्मिक जग प्राप्त होते जिथे दुःख नसते या महिन्यात दररोज मंदिरात हजारो दिवे सुशोभित केले जातात. यातील प्रकाश वेदीसमोर ठेवलेल्या शेकडो दिवे ओलांडून उज्ज्वल प्रकाशात पसरले आहेत भक्ताची भावना वाढवणारे मुख्य मंदिर कक्ष. जे भव्यता उत्सव प्रत्येकजण भक्ती च्या क्षेत्र  चालते आहेत. संध्याकाळी वेदी थोडक्यात बंद केली जाते आणि त्यावर एक घोषणापत्र चालू होते.

दीपेशोत्सव महोत्सव एकत्रित भाविकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते या उत्सवाचा. घोषणेनंतर, भक्तांनी गोड गोड बोलण्यास सुरुवात केली कीर्तन आणि वेदी उघडते. आदी शक्तीच्या तीन रूपांचे तेजस्वी दृश्य धूर तळाशी सगळीकडे मंत्रमुग्ध होतात. एक भव्य आरती भक्त म्हणून सुरू आहे आदी शक्तीचे तीन रूप गा. आरतीनंतर सर्व जमलेल्या भक्त आदी शक्तीला तूप लावण्याची संधी मिळवा. यावर्षी आम्ही नोव्हेंबर 03, 2017 रोजी दीपोत्सव साजरी करीत आहोत. या शुभ प्रसंगी तुम्ही खालील सेवा देऊ शकता आणि शोधून काढू शकता आदी शक्ती किंवा दैवी माता या तीनही स्वरांना आशीर्वाद. श्री महासरसवती शिक्षणाची देवी, श्रीमहालक्ष्मी, समृद्धी देवी आणि श्री महाकाली, देवी जी वेळ आणि मृत्युपासून मृतांना मुक्त करते.
दीपालंकार सेवा तूप व तेल यांमध्ये योगदान द्या जे शेकडो दिवे प्रकाशासाठी वापरतात वेदीजवळच्या सभोवती भांडे असतात.

Advertisements

आज नवरात्रोत्सवाच्या अष्टमी निमित्त महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फेअभिनेते अजय पुरकर , अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी , मंदिराच्या प्रमुख विश्व्स्त सौ . अमिता अगरवाल यांच्या हस्ते २०० परिचारिकांचा साडी चोळी देऊन ओटी भरून त्यांच्या सेवेबद्दल कृतन्नता व्यक्त करण्यात आली

पुणे- दिनांक २८ सप्टेंबर २०१७-  परिचारिका रुग्णांची अहोरात्र सेवा करत असतात. त्याच समाजाच्या खऱ्या सेलिब्रेटी आहेत. असे उद्गार प्रसिद्ध कलावंत अजय पुरकर यांनी आज गुरुवारी सायंकाळी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात  ससून रुग्णालय, डॉक्टर पाटणकर नर्सिंग होमी, संजीवनी हॉस्पिटल मधील २०० परिचारिकांचा सत्कार करताना काढले.
आज नवरात्रोत्सवाच्या अष्टमी निमित्त महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फेअभिनेते अजय पुरकर , अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी , मंदिराच्या प्रमुख विश्व्स्त सौ . अमिता अगरवाल  यांच्या हस्ते  २०० परिचारिकांचा साडी चोळी देऊन ओटी भरून त्यांच्या सेवेबद्दल कृतन्नता व्यक्त करण्यात आली . याप्रसंगी ससून रुग्णालयाच्या नर्सिंग सुपरिंटेंडेन्ट श्रीमती शंकुतला नागरगोजे , संजीवनी हॉस्पिटलच्या गौरी डिंगणकर, पाटणकर रुग्णालयाच्या नेहा वैद्य , मंदिराच्या विश्वस्त तृप्ती अगरवाल , ऍड  . प्रताप परदेशी , हेमंत अर्नाळकर , माजी नगरसेवक शिवा  मंत्री , नगरसेवक प्रवीण चोरबेले , नगरसेविका मनीषा वाबळे  आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अभिनेते पुरकर म्हणाले कि, परिचारिका स्वतःचे कुटुंब विसरून अहोरात्र कष्ट करत असतात . रुग्णाची सेवा करून त्यांना बरे करून ते पुन्हा घरी पाठवतात . हि त्यांची त्याग मयी सेवा समाजापुढे एक मोठा आदर्श आहे. आपण सर्व सामान्य लोक आहोत.  परंतु परिचारिका मात्र असामान्य व्यक्ती आहेत .
अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी आपल्या अल्पशा भाषणात परिचारिकांच्या सेवेला वन्दन केले.
ससून रुग्णालयाच्या नर्सिंग सुपरिंटेंडेन्ट नागरगोजे म्हणाल्या कि, रुग्णांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. आताचा वेगळा आहे . परिचारिका या कुटुंबवत्सल असून , त्या आपापल्या कुटुंब , मुलाबाळांना विसरून रुग्णाच्या सेवेला प्रथम महत्व देतात. ते आपलं कर्तव्य मानतात. याप्रसंगी नेहा  वैद्य , गौरी डिंगणकर , आदी परिचारिकांची भाषणे झाली . मंदिराच्या विश्व्स्त प्रमुख सौ अमिता अगरवाल, विश्वस्त तृप्ती अगरवाल  यांचेही यावेळी भाषण झाले. माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण चोरबेले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातर्फे आज विश्वस्तांनी व भाविकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातर्फे आज विश्वस्तांनी व भाविकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
पुणे- दिनांक -२७ सप्टेंबर २०१७– सांगा देवी… माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला … हि देवीची स्तुती करणारी आराधना म्हणत अंध मुलांनी आज महालक्ष्मी देवीला साकडं घातलं . आज बुधवारी दुपारी ४. वाजता सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अंध मुलांच्या गवळण,भक्तिगीते,अभंग , देवीच्या भजनानंतर मंदिरात जमलेल्या भाविकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.

महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कोरेगांव पार्क येथील पुणे अंधशाळा , मुलांची या अंध शाळेतील ५० अंध मुलांच्या हस्ते महालक्ष्मी देवीची सामूहिक आरती केली.   त्यानंतर महालक्ष्मी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल यांच्या हस्ते शालोपयोगी साहित्य देऊन खास सन्मान  करण्यात आला. याप्रसंगी विश्वस्त सौ. तृप्ती अगरवाल , ऍड . प्रताप परदेशी, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक शिवा  मंत्री, विश्वस्त हेमंत अर्नाळकर , प्रदीप देशमुख, अंध शाळेतील शिक्षक रामेश्वर शिळे, राजाराम जगताप , संतोष जगताप , रंगनाथ गजरे,   राजेंद्र सुतार , नितीन खरात आदी उपस्थित होते.
आज दुपारी ४. ३० वाजता अंध शाळेतील मुलांनी,  आई गोंधळ मांडला ग ..,  उघड दार देवा आत्ता … , हे ललाटाची भांडार .. दूर झोकून दे अंधार … . आदी भक्तिगीते, गवळण , अभंग सादर करून सर्व भाविकांची मने जिंकली. त्यांच्या आवाजातल्या गोडव्याने सौ. अमिता अग्रवाल यांच्यासहित भाविंकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. यांनतर सौ. अमित अगरवाल यांनी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नेत्रदान करण्याचं आवाहन केले.   नेत्रदान केल्यांनतर या अंध शाळेतील मुलांना नेत्रदृष्टी मिळवून देण्याचाही संकल्प करण्यात आला. तसेच भाविक व मंदिराचे सर्व विश्वस्त नेत्रदानाचा फॉर्मही भरून देणार आहे.

महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे- ३०० मुलींचे धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन

पैठणीचा घोळ ग … हिरव्या साडीला पिवळी किनार, आज मंगळवार देवीचा वार गं  …..या महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा मातेच्या आळवणीने पुणे  महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी करत आज मंगळवारी दुपारी सारसबागेसमोरील महालक्ष्मीच्या मंदिराचा परिसर मंगलमय करून टाकला. मुलींचा उत्साह पाहून अभिनेत्रींनाही मुलींची शिकवणी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीही कन्यापूजन उत्साहात साजरे केले.
महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे नवरात्रोत्सव निमित्त आज मंगळवारी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या संत
ज्ञानेश्वर  विद्या मंदिर, संत नामदेव प्राथमिक विद्यालय , सीताराम आबाजी बिब्वे स्कूल , भामरे स्कूल आदी शाळांमधील ३०० मुलींचे कन्यापूजनाचा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात  प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे , व अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल , विश्वस्त तृप्ती अगरवाल ,ऍड . प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले , विश्वस्त रमेश पाटोडीया, माजी नगरसेवक शिव मंत्री  आदी मान्यवर उपस्थित होते.
आज दुपारी ४. वाजता सरसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन कार्यक्रमास प्रारंभ झाला. आरंभी विविध शाळांमधील मुलींनी जय मातादीचा जयघोष केला. त्यापाठोपाठ पैठणीचा घोळ गं , हिरव्या साडीला पिवळी किनार…  आज मंगळवार आज देवीचा मंगळवार.  आणि चोरी चोरी माखन खा गये , यशोदा के ललनवा….  हि गीते सादर केली.
त्यांनतर अभिनेत्री शर्वरी जेमनीस यांनी मुलांना उपदेश करणारे गीत ऐलमा पैलमा  गणेशदेवा शिकणे … गणपतीच्या हातात मोदक .. तुमच्या हाती पाटी … तुम्ही चांगले शिका … हे गीत  त्यांच्याकडून गाऊन घेतले. त्यांनंतर मुलींशी संवाद साधताना जेमनीस म्हणाल्या कि , मुलींनी भरपूर शिकावे. तुम्हाला ज्या गोष्टी शिकताना आनन्द होतो. तीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा.
अभिनेत्री ज्योत्स्ना म्हाळसे यांनी मुलींची शिकवणीच घेतली. त्यांनी या मुलींना तुमची शाळा आवडते का.. शाळेत काय शिकवलं जात. असं विचारत देवीची माहितीही समजावून दिली. यांनतर अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी यांनी मुलींना सांगितले कि, मुलींनी खेळण्याबरोरबरच भरपूर वाचन करावे.
या अभिनेत्रींच्या भाषणानंतर कन्यापूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. या तिन्ही अभिनेत्रींनींनी सर्वप्रथम मुलींचे पाय धुतले. त्यांनतर हळद कुंकू लावले. गजरा त्यांना मळून त्यांची धार्मिक व पारंपरिक पद्धतीनं पूजा केली. यांनतर महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे या मुलींना शालोपयोगी साहित्य भेट दिले.

प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जेमनीस , ज्योत्स्ना म्हाळसे , अश्विनी कुलकर्णी यांनी आज मंगळवारी  सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या सहकारनगर व महर्षीनगर , दत्तवाडी परिसरातील विविध शाळांमधील ३०० मुलींचे धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन केले.

आम्ही सफाई कर्मचारी नसून तर आम्ही आरोग्याचे रक्षक- महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रौत्सव मध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांची भावना

पुणे दिनांक २५. ०९. २०१७ – आम्ही सफाई कर्मचारी नसून तर आम्ही आरोग्याचे रक्षक व जवान आहोत अश्या शब्दात पुणे महानगर पालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता सरसबागे समोरील महालक्ष्मी मंदिरात सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले . आज श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग नवरात्रौत्सव तर्फे पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टी. म . वि .  कॉलनी कोटी, कलाभूमी कोटी, ढोले मळा कोटी, व संदेश नगर
कोटी मधील १०० हुन अधिक महिला कर्मचायांच्या प्रसिद्ध अभिनेत्री माधवी मोरे ( मी शिवाजी राजे भोसले बोलतोय फेम ), मंदिरच्या प्रमुख विश्वस्त सौ अमिता अगरवाल, माजी खासदार प्रदीप रावत यांच्या पत्नी आशा रावत, विश्वस्त तृप्ती अगरवाल यांच्या हस्ते साडीचोळी देऊन ओटी भरून सन्मान करण्यात
आला त्यावेळी बोलताना महिला सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेत्री माधवी मोरे म्हणाल्या की, आम्हाला तुम्हा सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे. तुम्ही जी सेवा करत आता, त्यामुळे पुणे शहराचे आरोग्य उत्तम राहिले आहे.
सौ आशा रावत म्हणाल्या कर, केवळ रस्ते स्वच्छ करून उपयोग नाही. त्याचबरोबर, आपली मनेही स्वच्छ झाली पाहिजेत.  मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अगरवाल म्हणाल्या कि,पुणे मनपाच्या सफाई कर्मचारी दररोज स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पुणे शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नाचे आपण सर्वानी सन्मान केलाच पाहिजे. या हेतूने मंदिरातर्फे त्यांचा सन्मान केला जात आहे.
विश्वस्त तृप्ती अगरवाल म्हणाल्या कि, सफाई कर्मचारी केवळ साफसफाई करणारे कर्मचारी नाहीत. ते शहर , रस्ते स्वच्छ ठेवतात म्हणून  आपण पुणे शहरात व्यवस्थित राहतो. रोगराईपासून लांब राहतो .
याप्रसंगी पुणे मनपाच्या सहायक आरोग्याधिकारी कल्पना बळिवंत , आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान , यांची समयोचित भाषणे झाली. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेविका सौ मनीषा चोरबेले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विश्वस्त हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोडीया राजकुमार अगरवाल आदी मान्यवर उपस्थतीत होते.
 महालक्ष्मी मंदिर,सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज पाचव्या दिवशी महालक्ष्मी मंदिरात पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कर्मचाऱ्यांचा साडी-चोळी देऊन ओटी भरून खास सन्मान करण्यात आला.
फोटोत डावीकडून – मंदिराच्या विश्वस्त तृप्ती अगरवाल, रमेश पाटोडीया ,सौ आशा प्रदीप रावत ,प्रमुख विश्वस्त सौ. अमिता अगरवाल , अभिनेत्री माधवी मोरे,माजी नगरसेविका सौ. मनीषा चोरबेले , पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्याधिकारी कल्पना बळिवंत, उपस्थतीत होते.